Published On : Sat, Jun 2nd, 2018

अनिकेत तटकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ


मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विभागातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी अनिकेत तटकरे यांना सदस्यत्वाची शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विभागातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत कोकण विभागातील या आमदारकीवर अनिकेत तटकरे यांनी शिक्कामोर्तब केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रतिष्ठेची निवडणूक लढवली गेली.

Advertisement

आज अनिकेत तटकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. या शपथविधीला त्यांचे वडील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार सुनिल तटकरे, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, आमदार विदया चव्हाण, शेकापचे आमदार जयंत पाटील, राज्याचे प्रधान सचिव अनंत कळसे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार संजीव नाईक, माजी खासदार संजय दिना पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे,रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने या सोहळयाला उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement