Published On : Thu, Oct 10th, 2019

दीक्षाभूमीवर आंध्रा बँकेतर्फे हजारो बेरोजगारांना स्वयंरोजगाराचा गुरुमंत्र

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ रोजी विजयादशमीला दिलेल्या धम्मदीक्षेच्या सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधव हजेरी लावतात. यातील लाखो तरुणांना स्वयंरोजगारच गुरु मंत्र देण्याचे काम आंध्रा बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे. दीक्षाभूमीवर तीन दिवस झालेल्या सोहळ्यात आंध्रा बँकेची चमू विविध शिफ्टमध्ये बेरोजगारांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत होती.

दीक्षाभूमीवर देशाच्या कान्याकोपऱ्यातून लाखो बांधव येतात. त्यांना बँकिंग क्षेत्राची विशेष माहिती नसते. रोजगार हाताशी नसलेले बेरोजगार खासगी बँकेचे कर्ज घेऊन आपला रोजगार सुरु करतात यात त्यांची मोठी लूट केली जाते. यासाठी आंध्रा बँकेने विशेष स्टाल लावले आणि यात लाखो युवकांना पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेसह विविध कर्ज योजनांची माहिती दिली. यासोबतच सुलभ आणि स्वस्त दरात कर्ज कसे उपलब्ध होईल याची माहिती पुरविण्यात आली.

आंध्रा बँकेच्या एससी.एसटी. वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमाने सतत तीन दिवस विशेष स्टाल लावण्यात आले होते. येथे युवकांसह सामान्य लोकांना व शेतकऱ्यांना खासगी सावकाराच्या जाळ्यात न अडकता खासगी कर्ज न घेता राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. कर्ज घेण्याच्या सुलभ आणि सोप्या पद्धतींची माहिती दिली गेली, ही सेवा सतत तीन दिवस अविरत दिली गेली. दरम्यान येथे येणाऱ्या जनतेसाठी बँकेने पाणी बॉटल, बिस्कीट पाकीट व इतर फराळाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. हजारोच्या संख्येने याचा लाभ बौद्ध बांधावणी घेतला.

यशस्वीतेसाठी सोनल घायवान, भारत वसेकर, उत्तम गरड, पारितोष सरदारे, प्रज्ञा भालेराव, राजू उमरढकर, चेतन कवळते, स्वप्नील भगत, व्हिकी जाट, एइएम रवी शंकर, रमेश रामटेके, राजेश धारगावे, ओमप्रकाश गौर, लोकेश सयाम आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.