Published On : Fri, Sep 25th, 2020

२५ सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त ऑनलाइन रॅलीचा कार्यक्रम संपन्न

Advertisement

नागपुर – विदर्भ फार्मसी असोसिएशन व तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन माध्यमातून विदर्भस्तरीय व्हर्च्यूअल फार्मसी रॅलीचा कार्यक्रम ऑनलाइन द्वारा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोविड १९ वर मार्गदर्शन व मुख्य उद्देश समाजाला सुरक्षित कसे राहावे याबद्दल अवगत करून दिलेत.

आणि कोव्हीड योद्धा म्हणून समाजात काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विदर्भ फार्मसी असोसिएशनचे मुख्य संयोजक निखिल भुते, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल चे कार्यकारी सदस्य हरीश गणेशांनी, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे माजी अधिष्ठता डॉ. गणेश मुक्कावार, तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. लोधी मॅडम, प्राचार्य विक्रांत चिलाटे, पतंजली युवा प्रभारी पंकज बांते, अभिजीत दरवडे, प्रिया ठाकरे , प्रीती भोयर, प्रशांत गटपाढे, संभाजी जगताप, अभिषेक केसरकर आणि करूणा पौनिकर यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी ऑनलाईन फार्मसी रॅली मध्ये उपस्थित होते. संचालन प्रिती भोयर, प्रास्ताविक निखिल भुते तर पुनम घारपुरे यांनी आभार मानले.