नागपूर – कामठी मार्गावरील नारी मेट्रो स्टेशनच्या महिला शौचालयात एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ चित्रीत करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे २० वर्षीय विद्यार्थिनी कॉलेजसाठी छत्रपती चौक मेट्रो स्टेशनवरून प्रवास करून नारी मेट्रो स्टेशनवर उतरली होती. स्टेशनवर उतरल्यानंतर ती महिला शौचालयात गेली असता, शेजारच्या टॉयलेटमध्ये एक युवक कमोडवर उभा राहून मोबाईलद्वारे तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थिनी घाबरून तात्काळ बाहेर आली. त्याचवेळी संधी साधून संबंधित युवक घटनास्थळावरून फरार झाला. पीडितेने लगेचच मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीचे वय अंदाजे २४ ते २५ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने चेहऱ्यावर मास्क व डोळ्यांवर गॉगल लावले असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून मेट्रो स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकारानंतर मेट्रो स्टेशन परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा लज्जास्पद घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





