Published On : Fri, Jul 31st, 2020

बावनकुळेंच्या नेतृत्वात आज कोदामेंढी येथे दुधाच्या भावासाठी आंदोलन

नागपूर: आजपासून संपूर्ण राज्यात भाजपाचे महाएल्गार आंदोलन छेडण्यात येत असून नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यातील कोंदामेंढी येथे उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता माजी पालकमंत्री व भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍याच्या दुधावा भाववाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात आ. टेकचंद सावरकर व भाजपाचे सर्व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. नागरिक शेतकर्‍यांनीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement