Published On : Wed, Sep 22nd, 2021

सोनू सूद यांना दिल्या जाणाऱ्या छळा विरोधात आप युवा आघाडी तर्फे आंदोलन

– उत्तम अभिनेते, समाज सेवक व आम आदमी पार्टी च्या शिक्षण क्रांती चे प्रचारक श्री. सोनु सुद यांना BJP केंद्र सरकार कडून दिल्या जाणाऱ्या त्रासाविरोधात आम आदमी पार्टी युवा आघाडी तर्फे सोनु सुद यांच्या समर्थनात आंदोलन

नागपुर – युवा आघाडी तर्फे केंद्र सरकार द्वारे सोनू सूद यांना दिल्या जाणाऱ्या छळा विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग नागपूर संयोजिका कविता सिंगल विदर्भ सोशल मीडिया प्रमुख गीता कोई कर यांच्या मार्गदर्शनाखाली व विधर्भ युवा आघाडी संयोजक पीयुष आकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. प्रामुख्याने राज्य युवा समिति सदस्य कृतल आकरे, युवा पूर्व विधर्भ संघटन मंत्री सौरभ दुभे, नागपुर युवा अध्यक्ष गिरीश तितरमारे, सचिव प्रतिक बावनकर, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, स्वप्निल सोमकुवर, हेमंत पांडे, पंकज मेश्राम, प्रियंका तांबे उपस्तित होते.

करोना महामारीच्या लॉकडाऊन काळात सोनु सूद यांनी समोर येऊन संपूर्ण देशवासियांना मोठी मदत केली, हजारो नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या, भोजन व्यवस्था केली या प्रकारे अनेक देशहित कार्य केले हे सर्व देश वासियांनी पाहिले करोना महामारीच्या काळात सोनु सुद हे एक देव दुत मासिहा म्हणून समोर आले.

सोनु सुद यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली आम आदमी पार्टी व मा. मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांच्या तर्फे सुरू असलेल्या शिक्षण क्रांती ची दखल घेत दिल्ली मधील होणाऱ्या सरकारी शिक्षण मॉडेल चा प्रचार प्रसार करून दिल्ली शिक्षण मॉडेल संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या सोबत कार्य सुरू केले त्याकरिता आम आदमी पार्टी तर्फे सोनु सुद यांना दिल्ली शिक्षण मॉडेल संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी देश का मेंतर या अभियानाचे प्रमुख करण्यात आले.

परंतू हे देश हिताचे कार्य गरीब जनतेपर्यत पोहोचू नये या द्वेषभावनेन BJP मोदी सरकार ने सोनु सुद यांना त्रास देणे सुरू केले व त्यांच्या घरी, ऑफिस ला कारण नसतांना इन्कम टॅक्स रेड करून त्रास देण्याचे काम सुरू केले…

BJP मोदी सरकार च्या या हुकुमशाहिला प्रतिउत्तर देण्यासाठी व सोनु सूद यांना प्रचंड जन समर्थन देण्यासाठी आज आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ संयोजक श्री पियुष आकरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार विरु्ध आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात मोठ्या संख्येत नागपूर मधील युवा वर्ग सहभागी होऊन सोनु सुद यांना आपले प्रचंड जन समर्थन देत आहेत. या वेळी सहभागी आप युवा आघाडी कार्यकर्ते पार्थ मिरे, ओम आरेकर, आकाश गजभिये, वीशाखा दुपारे, शुभम मोरे, योगेश पराते, प्रणाली सहारे,नरेश महाजन,स्वप्नील शेंडे, प्रभाकर मोटघरे,‌ मनीष सोमकुवर, निशीकांत माटे, गनेश राऊत, आकाश कावळे, राहुल कावळे, जॉय बांगडकर, हनोक मार्टिन, विश्वजीत मसराम, संजय सिंघ, आकाश वैद्य, राहुल मोरे, अंकित तिडके, बबलु मोहाडीकर, आकाश वेघ, प्रभात अंग्रवाल, राजेन्द्र शेलकर, अनिकेत नारद, आकाश कांबळे, कुणाल मंचलवार, नरेश महाजन, प्रदीप पौनिकर, क्लेमेंट डेबिट, गिरीश आखरे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.