Published On : Fri, Jul 17th, 2015

अमरावती (तिवसा) : किसान सभेच्या नेत्यांनी जाणल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या व्यथा

 

कर्जाचा डोंगर अन सततच्या नापिकीमुळे झाल्या आत्महत्या   
लवकरच दिल्लीत शेतकऱ्यांसाठी किसान सभेचे आंदोलन

सवांददाता / हेमंत निखाडे

Tiwasa (1)
अमरावती (तिवसा)।
शेतकऱ्यांवर शेतीसाठी असलेला कर्जाचा डोंगर आणि यातच होणारी सततची नापिकी या दोन प्रमुख कारणांन मुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. अश्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा 14 जुलै रोजी गुरुदेवनगर, मोझरी, शे.बाजार, तिवसा व अहमदाबाद या गावामध्ये किसान सभेच्या नेतेमंडळीनी भेट देऊन शेतकरी कुटुंबाशी प्रत्यक्ष संवाद साधला.

दौऱ्यामधे अखिल भारतीय किसान सभेचे भारतीय कार्यकारिणीचे नेते कॉमेड एम. के. शुक्ला(बिहार), हरपाल सिंह(माजी आमदार हरियाणा), जसवंत सिंह(म.प.), उदयन शर्मा (अमरावती) आदि नेते मंडली प्रामुख्याने दाखल होते. सर्वप्रथम त्यांनी शेंदुर्जना येथे मोहन सुधाकर येनोरकर या आत्महत्याग्रस्त शेत्कारीच्या कुटुंबाला भेट केली. सहकारी बँकेचे कर्ज व सततची नापिकी यामुळे कुटुंबाचा आधार गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Tiwasa (2)
त्यानंतर तिवसा येथील अनिल पुरुषोत्तम देशमुख साहेबराव गौरखेडे तर गुरुदेवनगर येथील सुभाष वानखेडे, मोझरी येथील योगेश अडीकाने, अहमदाबाद येथील देविदास दौलत तायडे या आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुतुबांशी किसान सभेने संवाद साधून आत्महत्येची कारणे व व्यया जाणून घेतल्या. यामध्ये प्रमुख्याने सर्व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सततची नापिकी, कर्जाच्या मोझ्यापायी झाली असल्याची माहिती जाणून घेतली व त्यांच्या कुटुंबांशी चर्चा केली.

या प्रसंगी महादेव, गारपवार, दिलीप शाममोहन, सुरेश मोरघडे, प्रभाकर आकोटकर, प्रफुल्ल कुकडे ओमप्रकाश वाघमारे, रामगोपाल निमावत, अजय गरपावर, अभिजित भेलेकर उपस्थित होते.