Published On : Tue, Jun 5th, 2018

उद्धव ठाकरेंच्या मनधरणीसाठी उद्या अमित शाह ‘मातोश्री’वर

Advertisement

मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने केलेल्या पराभवानंतर सत्तेत सहभागी असतांनाही कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपासोबत युती नकरता स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे युती कायम राखण्यासाठी भाजपाने खूपच जपून पावलं टाकणं पसंत केलं आहे. त्याचाच भाग म्हणून आता थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे.

उद्या म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ‘मातोश्री’वर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे.
संपर्क अभियान अंतर्गत अमित शाह हे मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानुसार ते ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना-भाजप युतीतील वाद चांगलाच चिघळला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यासाठी अमित शाह मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा युतीच्या वाटाघाटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत.

Gold Rate
09 july 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver/Kg 1,08,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिवसेनेने यापूर्वीच स्वबळाची घोषणा केली आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनीही त्याबाबतचा पुनरुच्चार करत, यापुढे कोणत्याही निवडणुकीत युती करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र भाजपकडून सातत्याने शिवसेनेला गोंजारण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: युतीसाठी पुढाकार घेतला आहे. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेशी युती करणं ही भाजपची अगतिकता असून, युती न झाल्यास काँग्रेस सत्तेत येईल, असा अंदाज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला. सर्व पार्श्वभूमीवर आता थेट अमित शाह यांना युतीसाठी मैदानात उतरवलं जात आहे. २०१९ च्या निवडणुकांआधी युतीसाठी अमित शाहांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Advertisement
Advertisement