Advertisement
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील शांतीवन येथील चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तु संग्रहालयाचे उद्घाटन करणार होते. मात्र आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पुढे मोदींच्या हस्ते होणारा हा कार्यक्रम कधी होणार यासंदर्भात कोणतीही तारीख सध्या तरी निश्चित झालेली नाही.
चिचोली येथील शांतीवन परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 1008 वस्तूंचा संग्रह प्रदर्शित करण्यासाठी भव्य इमारत बांधण्यात आली आहे. याठिकाणी प्रशिक्षण केंद्रेही पाहायला मिळतील. ज्यासाठी वसतिगृहासह आठ इमारती बांधण्यात आल्या आहेत.या परिसरात सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षकांसाठी निवास आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
Advertisement