नागपूर : अंबाझरी पोलिसांनी मोठी कारवाई करत पब्लिको कॅफेमध्ये सुरू असलेला अवैध हुक्का पार्लर उध्वस्त केला आहे. गुरुवारी (दि. 18 सप्टेंबर) दुपारी 4.15 ते 4.40 या वेळेत अंबाझरी बायपास रोडवरील पब्लिको कॅफेमध्ये धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी कॅफे मालकाला ग्राहकांना तंबाखू मिश्रित हुक्का पुरवताना रंगेहात पकडलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल प्रदीप गवांदे (वय 25, रा. रामनगर) असे आरोपीचे नाव असून, तो ग्राहकांना तंबाखू मिश्रित तेलंगखेदी हुक्का पुरवत होता. हे कृत्य सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स ॲक्ट 2003 (COTPA) च्या नियमबाह्य असल्याने कारवाई करण्यात आली.
धाडीत पोलिसांनी दोन हुक्का पॉट्स, विविध फ्लेवर्ड तंबाखू, तीन मोबाईल फोन तसेच इतर साहित्य मिळून तब्बल ₹80,560 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 274 तसेच COTPA कायद्याच्या कलम 5, 6, 7 आणि 20 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई डीसीपी (झोन 2) नित्यानंद झा, एसीपी (सिटाबर्डी विभाग) विलास शेंडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धाडीत पीएसआय राजेश लोही, भिवापुरे तसेच पोलीस कर्मचारी कमलेश, प्रवीण आणि सुभाष मंगळ यांचा सहभाग होता.