Published On : Wed, Aug 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून मुक्ततेच्या मार्गावर महापौर निता ठाकरे यांचा पुढाकार

Advertisement

नागपूर,: पर्यावरणासाठी घातक असलेल्या जलपर्णीच्या विळख्यातून अंबाझरी तलाव मुक्त करण्यात मनपाच्या घनकचरा विभागाला यश येत आहे. जलपर्णीतून अंबाझरी तलावासह शहरातील इतर तलाव मुक्त करण्याचा संकल्प महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केला आहे.

पर्यावरणासाठी घातक असलेल्या या जलपर्णी अंबाझरी तलावावर पसरली होती. शहरातील या ऐतिहासिक तलावाची जलपर्णीच्या विळखत्यातून मुक्तता करण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित यांच्या नेतृत्वात मोहिमेला सुरूवात झाली होती.तसेच नगरसेवक श्री. योगेश पाचपोर यांच्यासह इतर नगरसेवकांनी देखीलया मोहिमेसाठी पाठपुरावा केला आहे.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी विविध पातळ्यांवरून जलपर्णीचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महापौर श्रीमती ठाकरे यांनी सातत्याने या मोहिमेचा पाठपुरावा केला. तसेच आयुक्त डॉ. विपीन यांनी जलपर्णीच्या निर्मूलनासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जलपर्णी निर्मूलनाची मोहिम राबवावी, असे निर्देश प्रशासनाला दिले होते.

जलपर्णीला घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शक्य नसल्याने मनपाने वीड हार्वेस्टरची मदत घेतली. वीड हार्वेस्टर तलावाच्या मध्यभागी असलेल्या जलपर्णीला काठावर आणणे शक्य झाले. जवळपास तीन महिन्यांपासून ही मोहिम सातत्याने सुरू होती. उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभाग ही मोहीम यशस्वी करीत आहे. यामुळे संपूर्ण तलावात पसरलेल्या जलपर्णीचे निर्मूलन करणे शक्य होत आहे.

Advertisement

जलपर्णीला समूळ नष्ट करू – महापौर

पर्यावरणासाठी घातक असलेल्या जलपर्णीचे समूळ नष्ट करण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेले हे काम प्रशंसनीय असल्याची प्रतिक्रिया महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण अंबाझरी तलावावर जलपर्णीचे संकट आले होते. परंतु नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हे यश मिळविले आहे, असेही श्रीमती ठाकरे यांनी म्हटले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.