Published On : Wed, Aug 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अंबाझरी तलावात उडी घेतलेल्या १६ वर्षीय किशोरीला स्थानिक गोताखोरांनी वाचवले

Advertisement

Auto Draft

नागपूर : अंबाझरी तलावात आत्महत्येच्या प्रयत्नासाठी उडी घेतलेल्या १६ वर्षीय किशोरीला स्थानिक गोताखोरांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

धर्मपेठेतील गवळीपुरा परिसरात राहणारी ही किशोरी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. पहाटे सुमारे ४ वाजता वडिलांना ती घरात दिसून आली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.

दरम्यान, सकाळी सुमारे ९ वाजता किशोरी अंबाझरी तलावावर पोहोचली आणि पाण्यात उडी घेतली. तलावाजवळ उपस्थित असलेल्या स्थानिक गोताखोरांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यात उतरून तिला सुखरूप बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कारवाईसाठी किशोरीला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीत तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी तिचे समुपदेशन करून तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.