Published On : Wed, Jan 9th, 2019

मिहान खापरी पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना गाळे आणि भूखंड लवकर वाटप करा- पालकमंत्री

Advertisement

C BawankuleC-Bawankule-600×364.jpg

नागपूर: मिहानमधील खापरी येथील म्हाडायोजनेअंतर्गत असलेल्या वसाहतीला मिहानने रिकाम्या जागेवर गाळे बांधून म्हाडाला हस्तांतरीत करावे. तसेच ज्याचे भूखंड या प्रकल्पात गेले. त्यांना भूखंड व घरे गेली असतील त्यांना गाळे म्हाडाने वाटप करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मिहानला दिले.

मुंबईत मंत्रालयात ही बैठक आज पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतली. या बैठकीला एमएडीसीच्या वल्सा नायर सिंग, प्रधान सचिव काकाणी, म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. खापरी येथे एकूण 16 हेक्टर जागा होती. त्यापैकी 6 हेक्टर जागा म्हाडाला मिळाली. 10 हेक्टर जागेवर एमएडीसीने गाळे बांधून त्या इमारती म्हाडाला हस्तांतरीत कराव्या. ज्यांची घरे प्रकल्पात गेली त्यांना गाळे व भूखंड गेला त्या बदल्यात तेवढाच भूखंड देण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.

म्हाडाचे 224 गावे आणि 100 भूखंड मिहानच्या ताब्यात आहेत. या नागरिकांना मिहानने विकसीत जागा द्यावी मिहानचे म्हाडासारखी योजना राबवावी आणि म्हाडाला हस्तांतरीत करावी. म्हाडाने ते गाळे प्रकल्पग्रस्तांना वाटप करावे. भूखंड वाटपासाठी खुल्या जागेचे लेआऊट मध्ये रुपांतर करा. या योजनेत काही उच्च उत्पन्न गट, अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटाचे गाळे राहतील.