Published On : Mon, Jun 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात धर्मांतरासाठी दबाव, ब्लॅकमेलिंगसह शोषणाचा आरोप; दोन आरोपींना अटक

Advertisement

नागपूर : शहरातील सोनेगाव परिसरात एका विवाहित महिलेने धर्मांतरासाठी दबाव टाकणे, आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे आणि आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात सोनेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

तक्रारीनुसार, महिलेच्या एका माजी वर्गमित्राने तिला गुंगीचे औषध देऊन हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत दीर्घकाळ शोषण करण्यात आल्याचे महिलेने म्हटले आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिलेचा आरोप आहे की, आरोपींनी तिच्यावर धर्मांतरासाठी सतत दबाव टाकला. तसेच विविध कारणे सांगून तिच्याकडून तीन लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. काही धार्मिक आणि कथित तांत्रिक विधींच्या नावाखाली मानसिक छळ केल्याचाही आरोप तिने केला आहे.

या प्रकरणात अय्याज ताज मदारे आणि आमीन शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर हजरत मौलाना नावाचा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Advertisement

पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कार, धर्मांतराचा प्रयत्न, आर्थिक शोषण तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय, अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मोबाईल चॅट, सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहार आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासले जात आहेत.

दरम्यान, न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.