Published On : Wed, Sep 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील अल्पवयीन मुलीला ५५ हजारांत गुजरातमध्ये विकल्याचा आरोप; १० वर्षांपासून फरार तीन आरोपी अटकेत

- खरबी रोडवरून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन महिलांचा समावेश
Advertisement

नागपुरातील अल्पवयीन मुलीला ५५ हजारांत गुजरातमध्ये विकल्याचा आरोप; १० वर्षांपासून फरार तीन आरोपी अटकेत

नागपूर : अल्पवयीन मुलीला गुजरातमध्ये कथितरित्या ५५ हजार रुपयांना विकल्याच्या गंभीर प्रकरणात तब्बल १० वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्गच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराची १७ वर्षीय मुलगी हिला गुजरातमध्ये ५५ हजार रुपयांना विकल्याचा आरोप आरोपींवर आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

फरार आरोपींचा शोध घेत असताना २१ सप्टेंबर रोजी पोलिसांना ते नागपुरातच लपून राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी खरबी रोड परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभम विकास पातुरकर (३२), रीता विकास पातुरकर (६०) आणि नेहा इरफान शेख (३०) अशी असून, तिघेही रोशनबाग, खरबी रोड परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. नाबालिग मुलीला गुजरातमध्ये नेण्यापासून ते कथित विक्रीपर्यंत आरोपींची नेमकी भूमिका काय होती, तसेच गेल्या दहा वर्षांत ते कुठे लपून राहत होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement

ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे आणि सहायक पोलीस अधीक्षक पांडुरंग सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक पंजाबराव डोले, सहायक निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, उपनिरीक्षक दिनकर भुतेकर यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.