
उमरेड (नागपूर) : उमरेड शहरातील सर्वे क्रमांक ३५३ मधील अधिसूचित ‘गोपाला तलाव’ भराव टाकून बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जमीन बचाव फाउंडेशनने या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडे उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
फाउंडेशनच्या निवेदनानुसार, संबंधित सुमारे १४ हेक्टर क्षेत्र महसुली अभिलेखांमध्ये स्पष्टपणे ‘तलाव’ म्हणून नोंदलेले आहे. हा जलाशय अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पशुधनासाठी महत्त्वाचा पाण्याचा स्रोत राहिला आहे. मात्र, अलीकडील काळात या तलावात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून त्याचे स्वरूप बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महसुली नोंदींवर प्रश्नचिन्ह-
माहितीच्या अधिकारातून (RTI) मिळालेल्या कागदपत्रांचा हवाला देत फाउंडेशनने महसुली नोंदींमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा दावा केला आहे. काही नामांतरण नोंदी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नसल्याचे, तर काही नोंदी संशयास्पद पद्धतीने करण्यात आल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. तसेच, काही प्रकरणांमध्ये चुकीच्या मृत्यू तारखांच्या आधारे नोंदी बदलण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शासकीय योजनांचा गैरवापर?
फाउंडेशनच्या आरोपानुसार, तलाव क्षेत्रात भराव टाकण्यासाठी विविध शासकीय योजनांचा गैरवापर करण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलाशयाचे मूळ स्वरूप नष्ट करून त्याचे अन्य वापरासाठी रूपांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी-
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष समिती नियुक्त करावी, महसुली नोंदींची सखोल पडताळणी करावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी अथवा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जमीन बचाव फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, गोपाला तलावासंदर्भातील या आरोपांमुळे उमरेड परिसरात खळबळ उडाली असून, चौकशीतून नेमके सत्य समोर येणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
भांडेवाडी में 60 वर्षीय बुजुर्ग ने 4 साल की मासूम के साथ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 17 JUNE 2026 #news...
बीएसएनएल केबल चोरी रैकेट का पर्दाफाश.. #nagpurnews #crime #latestnews #newsupdate
आरटीआई में चौंकाने वाला खुलासा सामने आया.. #maharashtranews #latestnews #newsupdate
42 डिग्री तापमान से जनजीवन प्रभावित ...#news #newsupdate #latestnews #vidarbha #maharashtranews
MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन बाप-बेटा गिरफ्तार..#nagpurnews #crime #mddrugs #latestnews








