Published On : Thu, Jul 30th, 2020

तिडके शाळेत सर्वच पास

बेला: विमलताई तिडके विद्यालयातील दहावीच्या परीक्षेला बसलेल्या प्रतिश विद्यार्थ्यांपैकी संपूर्ण 38 मुले-मुली पास झाले आहे. एकही जण नापास न झाल्याने या शाळेची गावात परिसरात वाहवा होत आहे. धारणी राजेंद्र तेलरांधे( प्रथम क्रमांक89%) , चंचल अरविंद कोल्हे( द्वितीय86. 6%) तर सावंगी ची ज्ञानेश्वरी धनराज येर खेडे( तृतीय क्रमांक82%) ह्या सावित्रीच्या लेकींनी उल्लेखनीय गुण घेऊन मुख्याध्यापक राजेंद्र तिडके, आर बी महाले, महेंद्र महाले बी बी मून संदीप शहाणे या गुरुजनांचा बहुमान वाढवला आहे.

बेला येथे आजतागायत एकाही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला नाही. शतप्रतिशत यशाबद्दल तिडके शाळेची ऐतिहासिक नोंद झाली आहे.


मुख्याध्यापक तिडके व सहाय्यक शिक्षकांची बौद्धिक परिश्रमातून तिडके शाळेला हे अभूतपूर्व यश मिळाले आहे. ज्येष्ठ नेते सहकार महर्षी बाबुराव तिडके या शाळेचे अध्यक्ष आहेत.