Published On : Tue, May 7th, 2019

अखिल पारशिवनी शिक्षक संघाचे अध्यक्षपदी पाटील व सचिव राठोड

कन्हान: अखिल पारशिवनी तालुका प्राथमिक शिक्षक संघटणेची कार्यकारणी ची सभा आमडी येथे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांचे अध्यक्षेत आणि जिल्हा नेते रामुजी गोतमारे, सुनिलजी पेटकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत तालुका अध्यक्षपदी अनिल पाटील तर सरचिटणीस पदी प्रेमचंद राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अखिल पारशिवनी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात तालुका अध्यक्षपदी अनिल पाटील तर सचिव (सरचिटणीस) पदी प्रेमचंद राठोड, कार्याध्यक्ष – मनोज खोडके, संरक्षक -विजय तागडे, शिक्षक नेते – भोलेश उईके, रमेश सावसाकडे, प्रकाश सदावर्ती, सल्लागार – भिकराज जिवतोडे, धनराज क्षीरसागर, सुधाकर वसु , चुडामन गेडाम, नरेश उराडे, धनिराम निमकर, विनोद पात्रे, ज्ञानेश्वर बुटके, वरिष्ठ उपाध्यक्ष – चंद्रकांत धार्मिक, धनंजय दियेवार, कोषाध्यक्ष – अरविंद लोही, प्रसिद्धी प्रमुख – सोमेश्वर बोंदरे, विजय माहुरकर,
संपर्क प्रमुख – रंजित सलामे, सुरज बागडे, कार्यालयीन चिटणीस – शशिकांत मुलनकर, मारोती भक्ते, तालुका संघटक – मुकेश सावरकर, संयुक्त चिटणीस – दिलीप रामटेके, भीमराव सालवनकर, महिला सेल अध्य क्षा संध्या बेलसरे, सचिव – विभा वांदिले, उपाध्यक्षा – सुजाता मेश्राम, लता वंजारी, सुनयना लेनगुरे, महिला संघटक – हेमलता जिभे, मीना आत्राम, शिला जैस्वाल, शालीनी लोही, छाया मुसळे, सारीका जनबंधू, माधूरी घुले, निता मस्के, प्रतिभा बिसेन, सुमित्रा जिवतोडे, विजया धाडसे, भाग्यश्री गभणे, ललिता बावनगडे, कल्पना रेवतकर, ललीता लांजेवार आदींची निवड करण्यात आली. सभेला कार्याध्यक्ष आनंद गिरडकर, सरचिटणीस विरेंद्र वाघमारे, कोषाध्यक्ष पंजाब राठोड, प्रसिद्धी प्रमुख लोकेश सुर्यवंशी, संपर्क प्रमुख दिलीप जिभकाटे, प्रवक्ते तथा उमरेड तालुका नेते कृष्णा टिकले, उपसरचिटणीस उज्वल रोकडे , सल्लागार सुरेश समर्थ, योगेश ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश लाडेकर, भोलेश उईके, रविंद्र घायवट, विभाग प्रमुख ओमदेव मेश्राम, किशोर रोगे, विभाग उपप्रमुख नरेंद्र ढोके,अशोक डोंगरे, महीपाल बनगैया, धरमसिंग राठोड, हरीश्चंद्र रेवतकर, तुशार चरडे, शाम धोटे, महिला सेल सचिव सिंधू टिपरे, जिल्हा महिला उपाध्यक्ष उर्मिला गायकवाड, निशा परते आदीं पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थितीत होते. सभेचे प्रास्ताविक भिकराज जिवतोडे, सुत्रसंचालन प्रेमचंद राठोड यांनी तर आभार मारोती भक्ते यांनी मानले.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement