Published On : Fri, Sep 24th, 2021

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार प्राप्त

Advertisement

– संस्थेचे उपमहासंचालक रवी रंजन गुरू यांनी स्वीकारला हा बहुमान

नागपूर: अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार (स्थानिक स्वराज्य संस्था) पुरस्कार प्राप्त झाला आहे. बंगलोरच्या एज्युकेशन एक्सलेन्स अवार्ड अण्ड कॉनर्फरन्स या संस्थेने हा पुरस्कार संस्थेला प्रदान केला असून संस्थेच्यावतीने संस्थेचे उपमहासंचालक रवी रंजन गुरू यांनी बंगलोरच्या ताज वेस्टएंड या हॉटेलमध्ये झालेल्या समारोहात हा पुरस्कार स्वीकारला.

उत्तम गुणवत्ता असलेले शिक्षण, उत्तम प्रशासन, उत्तम योग्य सामाजिक योगदान या साठी हा पुरस्कार संस्थेला देण्यात आला. एज्युकेशन एक्सलेन्स ही संस्था भारतातील सर्व शैक्षणिक संस्थाचे सर्वेक्षण करून त्यांनी काही संस्थाची निवड केली होती. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ही उत्त्म आभासी ज्ञान प्रदान करण्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दलही पुरस्कार संस्थेला यावेळी मिळाला.

हा पुरस्कार आमच्या संस्थेसाठी एक मोठे यश असून संस्थेच्या कामगिरीमध्ये एक मैलाचा दगड ठरत आहे. संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवान करता उपयुक्त अनेक अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. संस्थेच्या देशभरातील ४५ हून अधिक विभागीय केंद्राद्वारे हे अभ्यासक्रम संचालित केले जातात. यात स्वच्छता निरीक्षक पदविका, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा, लोकल गव्हर्मेंट सर्व्हिस डिप्लोमा, डिप्लोमा इं लोकल गव्हर्मेंट फायनान्शियल मॅनेजमेंट, फायर अँड सेफ्टी फायर मेन्स ट्रेनिंग कोर्स असे अनेक उपयुक्त अभ्यासक्रम आहेत.