Published On : Tue, Oct 17th, 2017

सर्व खेळांना प्राधान्य देणे गरजेचे : नागेश सहारे

Sports committee
नागपूर: देशी खेळांसोबत इतरही खेळांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. खेळांसंबंधीच्या सर्व पायाभूत सुविधा पुरविण्यात येण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा विशेष समितीचे सभापती नागेश सहारे यांनी दिले. मंगळवारी (ता.१७) मनपा मुख्यालयात झालेल्या क्रीडा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी समिती उपसभापती प्रमोद तभाने, सदस्य प्रदीप पोहाणे, संजय चावरे, दिनेश यादव, सदस्या विरंका भिवगडे, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड उपस्थित होते.

यावेळी महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यात आली. यात महापौर चषक राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा, गौरव सोहळा, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, अ.भा. कबड्डी स्पर्धा, व्हॉलिबॉल स्पर्धा, राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापालिकेअंतर्गत झोननिहाय मैदान, जलतरण तलाव तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करण्याचे निर्देश सभापती नागेश सहारे यांनी दिले. मैदानासाठी आवश्यक सोयी सुविधांची पूर्तताही करण्यात यावी, असेही ते म्हणाले. शहरातील मैदानाचे सर्वेक्षण करण्यात यावे. त्यानुरूप त्याला विकसित करावे. त्या मैदानावर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

महानगरपालिकेच्या शाळेतील खेळांडूना आवश्यक त्या सुविधा व खेळ स्पर्धेसंदर्भातील आवश्यक ती आर्थिक मदत देण्यात यावी, असे निर्देश दिले. शहरातील गरीब खेळाडू व मनपाच्या हद्दीत येणाऱ्या खेळाडूंच्या दुखापतीसाठी आवश्यक निधीचे प्रावधान करण्यात यावे, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement