नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या चर्चेत आहेत. अजितदादा पक्षनेतृत्वावर नाराज असून लवकरच ते भाजपसोबत हातमिळवणी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच चर्चांना आता खतपाणी घालणारी बातमी समोर आली आहे.
अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो डिलीट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ निर्माण झाली. अजित पवार हे भाजप सोबत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे.