Published On : Sat, Apr 7th, 2018

भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना : अजित पवार

Advertisement


सोलापूर/टेंभुर्णी: सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला.

धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी देत नाहीय. वीज कनेक्शन तोडण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर विकासाला पैसाही सरकार द्दयायला नाही.हे सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोपही दादांनी केला.

माझ्या पोटाला चिमटा बसू लागलाय हे लोकांना कळू लागल्यानेच जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनामध्ये उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरत सरकारचा विरोध करताना दिसत आहे असेही दादा म्हणाले.

शेतकरी कर्जमाफी नाही, जातीचे आरक्षण दिलंच नाही,काळा पैसा आणतो म्हटले अदयाप पत्ता नाही,२ कोटी तरुणांना नोकऱ्या देतो सांगितलं दिल्या नाहीत,भ्रष्टाचारमुक्त देश करतो सांगितले परंतु यापैकी काहीच सरकारने पूर्ण केले नाही अशा फसव्या आणि नाकर्त्या सरकारच्याविरोधात राष्ट्रवादीने हे हल्लाबोल आंदोलन पुकारले असल्याचे दादांनी सांगितले.

पुढील २५ वर्ष तरी कमळाबाईची पाकळीही सापडता कामा नये – धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसादच भाजपाला झोपू देत नाहीय.आत्ता भाजपाच्या कमळाबाईला असे हद्दपार करुया की,२५ वर्ष तरी या कमळाबाईची पाकळीही सापडता कामा नये असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत केले.

टेंभुर्णीच्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांवर आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आपल्या शैलीत चांगलाच समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा आजचा सहावा दिवस असून पहिली सभा सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये प्रचंड उत्साहात आणि रणरणत्या उन्हात पार पडली.


सभेच्या सुरुवातीला आमदार बबनराव शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,खासदार विजयसिंह मोहितेपाटील, युवक अध्यक्ष संग्रामकोते पाटील यांनी आपले विचार मांडले.

या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहितेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्रामकोतेपाटील, विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे, जि.प.सदस्य विक्रांत पाटील, उमेश पाटील, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, आदींसह टेंभुर्णी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.