Published On : Fri, Jun 5th, 2020

अजित पवार यांनी पुणे जिल्हयातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले आदेश…

पुणे: -‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केली.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पाहणी केली.
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.

उद्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाईल. आम्ही केंद्रसरकारकडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.