Published On : Fri, Oct 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर,झिशान सिद्दीकींसह ‘या’ नेत्यांना मिळाले तिकीट

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूण 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

यापूर्वी पक्षाने 38 उमेदवार घोषित केले होते.आता अजित पवार गटाचे एकूण 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

अजित पवार गटात आज झिशान सिद्दिकी, निशिकांत पाटील, संजयकाका पाटील, सना मलिक आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना पक्षप्रवेश देण्यात आला. पक्षप्रवेश होताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.

‘या’ उमेदवारांना मिळाले तिकीट –
1. इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील
2. तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील
3. अणुशक्तीनगर – सना मलिक
4. वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
5. वडगाव शेरी – सुनील टिंगरे
6. शिरुर- ज्ञानेश्वर कटके
7. लोहा – प्रताप चिखलीकर

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.