Published On : Fri, Jun 23rd, 2017

नागपूरातल्या महेश्वरने बनवले कचऱ्यापासून विमान

Advertisement

Maheshwar Dhone
नागपूर:
आपल्या पालक, शिक्षक आणि आपल्या मित्रमंडळींकडून प्रेरणा घेऊन कागदी विमाने उडविण्यात आपल्यापैकी अनेकांनी बालपणे खर्ची घातली आहेत. आजही अनेक चिमूकले हात तेच करत असतात. पण, याला अपवाद ठरलाय नागपूरचा महेश्वर ढोणे. वय वर्षे 13 ते 14 असलेला मोरेश्वर इयत्ता आठवीत शिकतो. मात्र, आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती त्याने चक्क विमान बनवले आहे. विशेष म्हणजे हे विमान त्याने कचऱ्यातील थर्माकोलवर प्रक्रिया करत बनवले आहे. तसेच, हे विमान त्याने यंत्र लाऊन रिमोटच्या सहाय्याने उडवूनही दाखवले आहे. त्याच्या या टॅलेंटचे सध्या सर्वत्र कौतूक होत असून, मोरेश्वरच्या टॅलेंटची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ही घेईल असा विश्वास नागपूरकरांना वाटतो.

‘वापरा आणि फेकून द्या’ ही आपल्याकडे सर्रासपणे वापरली जाणारी पद्धत. त्यामुळे चांगल्याच्या शोधात आपल्याकडून किती कचरा जमा होतो. किंवा अनकदा चांगल्या गोष्टीही कशा कचऱ्याच्या डब्यात जातात याची कधी गणतीच होत नाही. त्यात ‘टाकाऊपासून टिकावू’ ही संकल्पनात केवळ एक कागदी घोडाच. अनेकांच्या तोंडी तो बोलण्यापूरताच. पण, महेश्वर याला अपवाद ठरला. अनेक गोष्टींच्या पॅकींगसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल पॅकींग फोडले की, कचऱ्याच्या डब्यातच जाते हे त्याला कळले. त्यातूनच कचऱ्यात जाणाऱ्या थर्माकोलपासून आपण काहीतरी टिकाऊ नक्कीच करू शकते हा विचार मोरेश्वरच्या मनात चमकून गेला.

‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतूनच महेश्वरने एकेक वस्तू जमा करण्यास सुरूवात केली. यात थर्माकोलचा हिस्सा अधिक होता. त्यातून त्याने साकारले एक विमान. थर्माकोलच्या जाड पुठ्ठ्यांना कापून त्याने 85 सेंटीमीटरचे विमान आणि 1 मीटरचे पंख तयार केले. विशेष म्हणजे विमानाचा प्रकार, त्याचा आकार आणि त्याची निर्मीती ही त्याने स्वत:च केली. विमानाची निर्मीती करताना त्याला अनेकदा अपयश आले. तो चुकला. पण, म्हणून तो हिंमत हारला नाही. चुकातून शिकला. तो आत्मविश्वासाने काम करत राहिला. एक एक दिवस जात राहीला अखेर सहा महिन्यांनी त्याला या कामात यश आले. त्याने पूर्ण विमान तयार केले.

Gold Rate
17 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900/-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 2,01,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

थर्माकोलचे विमान बनवताना महेश्वरने १२ वोल्टची ब्रशलेस मोटर आणि १२ वोल्टच्या बॅटरीचा वापर केला. विमानाचे कॉकपीट कोकाकोलाच्या शिशीपासून तयार केले. छोट्या यंत्रांचा वापर वगळता आख्खे विमान त्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करूनच बनवले. महेश्वरचे टॅलेंट आणि त्याची क्रियेटीव्हीटी पाऊन इतर मुलांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास त्याचे शिक्षक, पालक आणि नागरिकांना वाटतो.

या कामासाठी त्याला एरोविजनचे राजेश जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तर, त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळे त्याचा उत्साह सतत वाढत राहिला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement