Published On : Mon, Jul 27th, 2020

ग्रामीण भागातील बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातून AIIMS ची पहिली आरोग्य सेवा

Advertisement

उमरेड तालुक्यातील बेला सर्वात मोठे गाव .गावाची लोकसंख्या 20 हजार वरती नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाचा नॅशनल कॉलिटी इन्शुरन्स हा बहुमान सन 2019 ला मिळवीला त्यासाठी ज्योती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर 2020 ला प्रथम पुरस्कार पटकुन बेला प्राथमिक आरोग्य केंद्राने बेल्याचे नाव आरोग्य सेवेत महाराष्ट्रात पोहोचविले. ISO नामांकन असलेले पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र अशी ओळख झाली.

नागपूर जिल्ह्यातील उत्तम रुग्णसेवा आणि उत्कृष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून बेला येथील आरोग्य केंद्राने जिल्ह्यात मान मिळविला आहे. एवढेच नाही तर सन 2020 ला डॉ.आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार पटकावून , बेला प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव संपूर्ण जिल्ह्यात “उत्तम आरोग्य केंद्र” म्हणून मान मिळाला. आणि विदर्भातून ग्रामीण भागात पहिल्यांदा हा मान उमरेड तालुक्यातून बेला गावाला मिळाला हा बेल्यासाठी फार मोठा बहुमान आहे अशी चर्चा परिसरातील लोकांमध्ये आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, (AIIMS) नागपूर यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बेला ता. उमरेड जिल्हा नागपूर येथील खाटा शैक्षणिक प्रयोजनाकरिता निशुल्क वापरण्यास मंजुरी देण्यात आली असून सध्यास्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र बेला येथेच उत्तम आरोग्य सेवा जनतेला देण्याकरिता प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर चमू येणार असून बेला व बेला परिसरातील लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे. मात्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच बाह्य रुग्ण (ओ. पी.डी.) सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहे आणि कायम स्वरूपी सुरू करण्याकरिता ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेची जागा (जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राची) जागा मंजूर करण्यात आली आहे.

अश्याप्रकारे नवीन इमारत बांधून ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु दिनांक 23 जुलै 2020 च्या शासन निर्णयानुसार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर ही केंद्रशासनाच्या अखत्यारीतील संस्थेची आरोग्य सेवा जनतेला देण्याकरिता सदर संस्थेस प्राथमिक आरोग्य केंद्र बेला ता.उमरेड जिल्हा नागपूर येथील खाटा शैक्षणिक प्रयोजनाकरिता निशुल्क वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये नवीन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत आरोग्य सेवा तात्काळ सुरु करून उत्तम आरोग्य सेवा जनतेला देण्यात येणार आहे.

तुषार मुठाल