Advertisement
नांदेड: एकीकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने ते कोंढा गावात मतदारांची भेट घेण्यासाठी आले होते.
‘एक मराठा-लाख मराठा’सह विविध घोषणा देत मराठा कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या गाडीचा ताफा अडविला.मराठा समाजाचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.