Published On : Wed, Dec 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

‘एजंट जॅक’चा परवाना रद्द! नागपुरात राजकीय पाठबळ असणाऱ्या कलब्सवरही अशीच कारवाई होणार का?

Advertisement

नागपूर : राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहर गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. नुकतेच एका राजकीय नेत्याच्या मुलावर खुनी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर नागपूर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ‘एजंट जॅक’ नावाच्या रेस्ट्रो बारचा परवाना रद्द केला.

मेडिकल चौकातील व्हीआर मॉलमधील एजंट जॅक पबमध्ये झालेल्या वादाला रक्तरंजित वळण आले असून, कुख्यात गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना यादव यांच्या मुलासह तिघांवर जीवघेणा हल्ला केला. ही थरारक घटना सोमवारी पहाटे इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अजनीतील आरक्षण केंद्राजवळील कांबळे चौकात घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Gold Rate
18 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,700/-
Gold 22 KT ₹ 1,23,400 /-
Silver/Kg ₹ 2,02,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

व्हीआर मॉलमधील एजंट जॅकमध्ये झालेल्या भांडणानंतर भाजप नेत्याच्या मुलावर हा खुनी हल्ला झाल्यानंतर सोमवारी, नागपूर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना बार आस्थापनाचा परवाना रद्द करण्यासाठी पत्र लिहिले आहे.मात्र, या घटनेने लोक हैराण झाले. एजंट जॅकच्या जागेवर हल्ला झाला नसतानाही, पोलिसांनी त्याचा बार परवाना रद्द करण्यासाठी पत्र लिहिले. महत्त्वाचे म्हणजे नागपुरात अनेक कलब्स, बार आणि रेस्टोरेंट आहेत. यातील अनेक कलब्स मारामारी आणि अश्लील घटनांसाठी प्रसिद्ध असताना पोलिसांनी त्यांना वाऱ्यावर सोडले. यामागील एकमेव कारण म्हणजे या कलब्स, बार आणि रेस्टोरेंटला असणारे राजकीय पाठबळ आहे .

नागपूरचे नाईट लाइफ नेहमीच चुकीच्या कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. नागपूर पोलिसांनी याकरिता विशेष मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या. मात्र याला आळा घालण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले. शहरातील प्रमुख आस्थापनांमध्ये महिलांशी सर्रास दारूच्या नशेत गैरवर्तन करण्यात येत असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.मात्र यावर करावाई होत नाही.

2023 मध्ये नागपुरातील पब्समध्ये घडलेल्या घटना –
-21 जानेवारी – डाबो येथे काही गुन्हेगारांनी कुटुंबियांना मारहाण केली.
– 24 मार्च – डाबोच्या बाहेर नशेत एका महिलेला विवस्त्र करण्यात आले.
– मार्च 31 – लॉर्ड ऑफ ड्रिंक्स पबच्या बाहेर प्रवेशावरून भांडण
– मार्च 31 – महिला सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला केल्याबद्दल डॅबो बाउन्सरांची ग्राहकाला मारहाण
– 30 एप्रिल – प्रिन्स तुलीने नागपूरच्या सीपी क्लबमध्ये सदस्यत्व नसल्यामुळे प्रवेश नाकारल्याने गोंधळ घेतला.
– 22 मे – डाबो पबमध्ये ग्राहक नाचत असताना एकमेकांना भिडल्याने भांडण.
10 जून – वर्धा रोड येथील पबजवळ संरक्षकांच्या जमावाने एका व्यक्तीवर हल्ला केला, त्यानंतर नागपूरमध्ये बसवर दगडफेक केली.
16 जुलै – नागपूरच्या लॉर्ड ऑफ द ड्रिंक्समध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी तरुणांच्या एका गटावर गुन्हा दाखल करण्यात आला.
19 नोव्हेंबर – धरमपेठेतील एका नामांकित क्लबमध्ये प्रवेशावरून गोंधळ.
25 डिसेंबर – नागपूरच्या इमामवाडा येथे ‘संडे नाईट पार्टी’नंतर मुन्ना यादवच्या मुलासह इतरांवर झाला हल्ला.

दरम्यान ‘नागपूर टुडे’शी बोलताना अमितेश कुमार यांनी एजंट जॅकचा बार परवाना रद्द केल्याची पुष्टी केली. बारमध्ये वारंवार होणाऱ्या मारामारीमुळे ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकारच्या घटना घडलेल्या कोणत्याही आस्थापनाला अशाच कारवाईला समोर जावे लागले, अशी प्रतिक्रिया अमितेश कुमार यांनी दिली.

-शुभम नागदेवे

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement