पूर्व नागपुरात निष्क्रिय शासनाविरुद्ध भा.ज.पा. चा एल्गार

पूर्व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित

नागपूर : पूर्व नागपुरात दि.25/02/2020 रोजी छापरूनगर चौक येथे दुपारी 3.00 वा. भा.ज.पा. चा धरणा-निदर्शने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात पूर्व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, मंडळ अध्यक्ष संजय अवचट व सर्व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले कि, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारने विकासकामे करण्याऐवजी विकासकामे थांबविण्याचा धडाका लावलेला आहे. कोटयावधीच्या विकासाचा निधीला स्थगिती या सरकारने दिली असून नागपूर शहरातील अनेक वस्त्यातील रस्ते, पाणी, स्ट्रोम ड्रेन व अन्य मुलभूत सुविधेची कामे थांबलेली आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा शासनाचा निर्णय देखील फसवी घोषणा म्हणूनच प्रत्ययास आलेला आहे.

चार महिन्याच्या कालावधीत एकही मोठे काम या सरकारने केले नसून नुसत्या घोषणाबाजी करण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे. सी.ए.ए./ एन.आर.सी. बाबत सरकारची स्पष्ट भूमिका नाही. भीमा कोरेगांव प्रकरणाचे राजकारण सरकार करताहेत.

त्यामुळे या विकासविरोधी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात धरणा निदर्शने करण्याचा निर्णय भा.ज.प. ने घेतलेला आहे. त्याच अनुषंगाने पूर्व नागपुरात छापरूनगर चौक येथे दि.25/02/2020 रोजी दुपारी 3.00 वा. भा.ज.पा. चा धरणा-निदर्शने कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आव्हान आमदार कृष्णा खोपडे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement