नागपूर : सर्वसामान्य नागरिकांची वाहिनी म्हटल्या जाणाऱ्या एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाडे वाढीला मंजूरी देण्यात आली आहे. येत्या २५ जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार येणार आहे. तर दुसरीकडे येत्या १ एप्रिलपासून ग्रहकांना वीज दर वाढीचाही फटका बसणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महावितरणकडून मांडण्यात आलेल्या वीज दर कपातीचा प्रस्ताव मंजूर होणार?
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं पहिल्यांदा दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात साधारणपणे 1 ते 15 टक्के कपात अपेक्षित आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2 कोटी वीज ग्राहकांना होणार आहे. महावितरणनं यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला दिला आहे. 2025-26 ते 2029-30 या कालावधीमध्ये 12 टक्के ते 23 टक्के दर कपातीचा प्रस्ताव आहे.
1 एप्रिल पासून होणार नवे दर लागू –
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणने इतिहासात पहिल्यांदा वीज दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. नवीकरणीयक्षम ऊर्जा प्रकल्पातून किफायतशीर दरात वीज उपलब्ध होणार असल्याने आणि कृषीपंपासाठी लागणार्या वीजेचा वापर सौर कृषीपंपांसाठी केल्यानं कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.लोकेश चंद्रा यांनी 2030 पर्यंत वीजनिर्मिती क्षमता 81000 मेगा वॅटपर्यंत नेण्याचा विचार असल्याचे म्हटले.1 एप्रिल पासून वीज दर कपातीचा निर्णय लागू होऊ शकतो. वीज बिलामध्ये पुढील पाच वर्ष 12 ते 23 टक्के कपात होऊ शकते, असं महावितरणचे संचालकविश्वास पाठक यांनी म्हटलं. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी फीडर प्रकल्प 2.0 यामधील प्रकल्प येत्या दोन वर्षात सक्रिय होतील.या प्रकल्पातून 16000 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचा फायदा घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना होईल, असे पाठक म्हणाले.