Published On : Mon, Sep 30th, 2019

1994 नंतर गाडेघाट नदीला आला महापूर

Advertisement

कामठी :-मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे तोतलाडोह व पेंच धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचे 14 दरवाजे हे 2 मी मी ने उघडले आहे तसेच नवेगाव ळवरी धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरले असल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी या धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत परिणामी कन्हान नदीला पाण्याचा चांगलाच पूर आला असून या नदीपात्रातील कामठी शहरातील गाडेघाट नदी ही तुडूंब भरलेली आहे .

तर हे दृश्य सन 1994 नंतर द्रुकष्टीक्षेपास पडल्याचे सांगण्यात येते.1994 मध्ये झालेल्या अतिवृष्टी ने या गाडेघाट नदीला पूर आला होता तर या नदी काठावरील असलेले गाडेघाट गाव, जुनी कामठी यासारखे गावे सुद्धा बुडण्याच्या मार्गवर आले होते.

काल पासून या गाडेघाट नदीला महापूर आले असता या नदीच्या कडेला असलेले गोराबाजाराच्या कडेला पाणी आल्याचे दिसले तसेच या नदीच्या तीरावर असलेला श्रद्धेय अम्मा चा दर्गा पर्यंत पाणी चढले होते तसेच महादेव घाट च्या पायऱ्यापर्यंत पाणी चढले होते तर या महादेव घाटावर बघ्यांची एकच गर्दी जमली होती

संदीप कांबळे कामठी