Published On : Tue, Nov 17th, 2020

अॅड. वंजारी यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका भंडारा जिल्‍ह्यातही झाली सभा

Advertisement

नागपूर: नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, पिरिपा (कवाडे), आरपीआय (गवई गट) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांनी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्‍ह्यात प्रचार केल्‍यानंतर आता भंडारा जिल्‍हयातदेखील प्रचाराचा जोर वाढवला आहे. मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे प्रचार सभा घेतल्‍यानंतर अॅड. वंजारी यांनी भंडारा जिल्‍ह्यातील शहापूर येथे सभा घेत कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साह भरला.

महाराष्‍ट्र विधान परिषदेत परिवर्तन घडवून आणण्‍याचा निर्धाराने पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी दिवाळी संपल्‍यानंतर प्रचाराचा वेग वाढवला आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोलीत सभा घेतल्‍यानंतर आज त्‍यांनी भंडा-यात सभा घेतली. त्‍यांच्‍यासोबत प्रत्‍येक सभेला अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्‍यक्ष डॉ. बबनराव तायवाडे उपस्‍थिती लावत आहेत.

Gold Rate
09 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,37,000/-
Gold 22 KT ₹ 1,27,400 /-
Silver/Kg ₹ 2,42,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उमरेड येथे झालेल्‍या सभेला आयटीआय उमरेडचे देवरावजी इटनकर यांच्‍यासह मंचावर माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्‍हा परिषद सदस्‍य शंकर डडमल, राजू सुटे, राष्‍ट्रवादी नेते लिलाधर धनविजय, माजी सभापती अरुण हटवार, शिवसेनेचे हरीष कडवू, नंदा नारनवरे, उमरेडच्‍या नगरसेवक योगिता ईटनकर, राष्‍ट्रवादी सेलचे अध्‍यक्ष विलास गवळी, माजी नगराध्‍यक्ष गंगाधर रेवतकर, िदलीप भोयर, रमेश किलनाके, शिरीष मेश्राम, सुरज ईटनकर, मनोज तितरमारे, महादेव जिभकाटे, सुरेश कुकडे, लिलाधर धनिवजय इत्‍यादींची उपस्‍थिती होती.

भंडारा जिल्‍ह्यात शहापूर येथे सभा घेण्‍यात आली. या सभेला माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी राज्‍यमंत्री बंडू साबरबांधे, भंडारा जिल्‍हा कॉंग्रेस अध्‍यक्ष मोहन पंचभाई, सचिव गौरीशंकर मोटघरे, प्रदेश सचिव प्रमोद तितरमारे, सेवादलाचे कैलास भगत, माजी जिल्‍ हा अध्‍यक्ष प्रेमसागर गणवीर, ओबीसी जिल्‍हा अध्‍यक्ष रवी भुसारी,अल्‍पसंख्‍याक जिल्‍हा अध्‍यक्ष आवेश पटेल, अनुसूचित जाती जिल्‍हा अध्‍यक्ष सुरेश मेश्राम, भंडारा तालुका सचिव धनंजय तिरफडे, एनएसयुआयचे जिल्‍हा अध्‍यक्ष पवन वंजारी, युवक कॉंग्रेसचे जिल्‍हा अध्‍यक्ष राकेश कारेमोरे, महिला कॉंग्रेस जिल्‍हा अध्‍यक्ष प्रिया खंडारे, सीमा थुटे, पायल सिंग, रुपलता जांभुळकर, जयश्री बोरकर, शिशिर वंजारी, अमर रगडे, अजय गडकरी, रिजवान काजी, विनीत देशपांडे, अभीर चौधरी यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement