Published On : Sun, Apr 19th, 2020

तालुक्यात एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची प्राशासनाने दखल घ्यावी- पालकमंत्री डॉ नितीन राऊत

पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना जीवनावश्यक वस्तू किटचे वितरण

कामठी:- कोरोना रोगाच्या संकटामुळे उद्भभवलेल्या स्थतीत तालुक्यात एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची तालुका प्रशासनाने दखल घेण्याचे आदेश राज्यचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना संबंधित अधिकाऱयांना दिले .

कोरोना विषाणूच्या संकटामुळे तालुक्यात उद्भभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात राज्याचे ऊर्जा व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला राज्याचे दुग्ध विकास व क्रीडा मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाणे ,आमदार टेकचंद सावरकर , जी प अध्यक्ष रश्मीताई बर्वे, कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश भोयर, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक ,कामठी नगर परिषद चे अध्यक्ष मोहम्मद शहजाह शफाहत , , जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल निधान ,जी प सदस्य अवनतीका लेकुरवाळे, जी प सदस्य नाना कभाले, काशीनाथ प्रधान, नीरज लोणारे, शकुर नागाणी , मतीन खान आदी उपस्थित होते.


तसेच , उपविभागीय महसूल अधिकारी श्याम मदनूकर ,तहसीलदार अरविंद हिंगे , , नवीन कामठी चे ठाणेदार राधेश्याम पाल ,कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके ,खंडविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी फुलकर , वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज चोखांद्रे, डॉ शबनम खानुनी आदी उपस्थित होते.या आढावा बैठकीत कोरोना रोगासंबंधी तालुक्यात रुग्णांची संख्या व त्यावर करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली सोबतच लॉक डाऊन संचार बंदीमुळे तालुक्यात उद्भभवलेल्या स्थितीत कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही याकरिता तालुका प्रशासनाच्यावतीने दखल घ्यावी व सरकारी स्वस्त धान्य दुकानातून प्रत्येक नागरिकाला योग्यरीत्या धान्य उपलब्ध करून देता येईल याकरिता सुद्धा तालुका प्रशासनाणे दाखल घेण्याचे आदेश देण्यात आले आढावा बैठकीनंतर पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांचे हस्ते काही जरूरतमदं गरीब नागरिकांना अन्नधान्य व जीवणावश्यक वस्तू किट चे वितरण करण्यात आले,

संदीप कांबळे