Published On : Fri, Aug 28th, 2020

प्रशासन व लोकप्रतिनिधी मनपाची दोन चाके

Advertisement

आयुक्त राधाकृष्णन बी.; पदाची सूत्रे स्वीकारली

नागपूर– ः जनतेसह जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन महापालिकेची दोन चाके आहेत, असे नमूद करीत नगरसेवक, आमदार यांच्यासोबत समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट संकेत नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. लोकाभिमुख व गतिमान प्रशासनावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन यांनी आज सकाळी महापालिकेत पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर दिवसभर त्यांनी प्रामुख्याने कोरोनासंदर्भात शहरातील स्थितीचा आढावा घेतला. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थेट नागरिकांसोबत संवादासाठी नेमके काय करता येईल, याचा नक्कीच विचार केला जाईल. प्रशासनात काम करताना सर्वांच्या मताचा आदर केला जाईल. जनता आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी महत्त्वाचे असून त्यांच्या समन्वयानेच शहराच्या विकासाचा गाडा पुढे हाकण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महापालिका निश्चितच आर्थिक संकटात असून त्यासाठी काटकसर करण्यात येईल. महापालिकेचा महिन्याचा खर्च, त्यानंतर कमी महत्त्वाचे, त्यानंतर अत्यंत कमी महत्त्वाचे, असा क्रम निश्चित करून आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय उत्पन्न वाढविण्यासाठी कुठलीही कसर ठेवणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.

कोरोनापासून जीव वाचविण्यावर भर
शहरात कोरोनाचे रुग्ण आणि बळी वाढत आहे. नागरिकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे असून यासाठी यंत्रणा कामाला लावणार आहे. वेळप्रसंगी २४ तास काम करण्याची तयारी आहे. येथील कोरोनाबाधित, बळींचा डाटा बघितल्यानंतर नागरिक उपचारासाठी विलंब करीत असल्याचे लक्षात आले. नागरिकांना जवळच्याच ठिकाणी उपचारासाठी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. गृहविलगीकरणात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष देणार आहे. गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा, बेड उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न राहणार आहे. खाजगी रुग्णालयात सरकारी दर तसेच बेड आरक्षणाचा ८०-२० फॉर्म्युल्याची अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

तपासणी करणाऱ्याकडून चुकीचे मोबाईल नंबर
अनेक नागरिक एकदा चाचणी केल्यानंतर पुन्हा चाचणी करीत आहेत. ते चुकीचे आहे. एकदा पॉझिटिव्ह अहवाल आला तर त्यानुसार उपचार घेणे योग्य आहे. एवढेच नव्हे अनेक नागरिक कदाचित समाजाच्या भीतीपोटी चाचणी करताना चुकीच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत आहे. एखादवेळी ते नागरिक गंभीर झाले तर कुठे संपर्क करायचा? असा सवाल करीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी योग्य मोबाईल क्रमांकाची नोंद करण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या कोरोना तपासणी केंद्रावर तेथील तपासणी क्षमतेचे फलक लावण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना जास्त वेळ उभे राहण्याची गरज राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement