
नागपूर – महाराष्ट्र विधानसभेसह विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशनातील आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. अधिवेशनादरम्यान गोंधळ आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाने बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
अधिकृत माहितीप्रमाणे, आता पुढील कामकाज मंगळवार, सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. स्थगितीनंतर विरोधक आणि सत्तापक्षाकडून आरोप-प्रत्यारोपांची मालिका पुन्हा रंगण्याची शक्यता वर्तवली जाते.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज ठप्प झाल्याने सर्वांचे लक्ष मंगळवारच्या सुरू होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे.
Advertisement









