Published On : Tue, Jan 23rd, 2018

आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेतेपदी

Advertisement

मुंबई – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पार पडली असून या बैठकीत आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पार पडलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचं नेतेपद कायम ठेवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंना मात्र यंदाही नेतेपद मिळालेलं नाही. सध्या शिवसेनेत मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, रामदास कदम, संजय राऊत, दिवाकर रावते आणि गजानन कीर्तिकर हे आठ नेते आहेत. त्यातील दोन-तीन जणांना वगळून नवीन चेहरे दिले जातील आणि त्यात आदित्य यांचाही समावेश असेल, अशी सुत्रांची माहिती होती.

सध्या शिवसेनेत 8 नेते तर 31 उपनेते आहेत. आदित्य ठाकरे सोडून कोणालाही नेतेपद नको, अशी मागणी शिवसेनेतील एका गटाने केली होती.