Published On : Tue, Jun 16th, 2020

पायाभूत सुविधांमध्ये परकीय गुंतवणुकीच्या संधी : नितीन गडकरी

Advertisement

‘असोचॅम’च्या पदाधिकार्‍यांशी ई संवाद

नागपूर: रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी लागणारा निधी परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून उभा करण्याच्या संधी यावेळी आहेत. ‘असोचॅम’ पदाधिकार्‍यांनी यावर विचार करावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Advertisement
Advertisement

‘असोचॅम‘ पदाधिकार्‍यांशी ते कोरोनाच्या प्रभावामुळे रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीची संधी, या विषयावर ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये अनेक सुधारणा आपण केल्या असून भविष्यातही अनेक सुधारणा होणार आहेत.

त्यासाठी काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. कामांमध्ये पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, जलद गतीने निर्णय या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- ‘असोचॅम’ने एनएचएआय मार्फत निर्माण होणार्‍या पायाभूत सुविधांसाठी परकीय गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न करावे. परदेशातील अनेक लोक, मोठ्या कंपन्या गुंतवणुकीस तयार आहेत. तसेच परदेशातून अत्यंत कमी व्याजदरात निधी उभा राहू शकतो. भांडवली बाजारातून पैसा उभा करा. भांडवली बाजारात खूप पैसा उपलब्ध होऊ शकतो. या दृष्टीने आम्ही एमएसएमईला भांडवली बाजारात नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. इन्शुरन्स, पेन्शन आणि स्टॉक एक्स्चेंज इकॉनामीतून निधी उभा करणे शक्य होऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रस्ते व राष्ट्रीय महामार्गांची कामे करताना बांधकाम खर्च कमी करून बचत करणे व कामाचा दर्जा सुधारणे यासाठी ‘असोचॅम’ने अधिक प्रयत्न करावेत. उड्डाणपुलांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर त्यासाठी विचार करता येईल. वेगळ्या पध्दतीचे साहित्य वापरून बांधकाम खर्च कमी करता येईल काय, याचे प्रयत्न असोसिएशनकडून होणे अपेक्षित आहे.

काम करताना समस्यांचा भरपूर सामना करावा लागेल. पण सकारात्मक विचाराने पुढे गेल्यास हे सर्व शक्य होईल. काही नकारात्मक भूमिकेचे अधिकारी अनेक कामात अडथळे निर्माण करतात, पण त्यातूनही मार्ग काढून काम पुढे न्यावे लागणार आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी आपण काही निर्णय घेणार आहोत, त्याचे परिणामही लवकरच दिसतील असेही गडकरी म्हणाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement