Published On : Sat, Oct 7th, 2023

राज्याचे अपर मुख्य सचिव नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी नागपुरात दाखल

Advertisement

नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर विभागातील शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यापार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन आणि नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार शुक्रवारी नागपुरातील वनामती येथे बैठक घेत आहेत. अपर मुख्य सचिवाच्या बैठकीनंतर नुकसानग्रस्तांना किती नुकसान भरपाई मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यादरम्यान वनामतीच्या संचालक डॉ मीताली सेठी, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी मिलिंद शेंडे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक रामराव मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्रीचिरूटकर, पिक विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्डचे अमन वर्मा, राहुल सनान्से, वनामतीचे कृषि उपसंचालक सुबोध मोहरील व ठोंबरे आदी उपस्थित होते. आजच्या बैठकीत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने आढावा घेतला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.