Published On : Mon, Nov 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नशेच्या व्यसनापायी बनला चोर; बजाजनगरातील डॉक्टरांच्या घरफोडीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश!

४२.७९ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त
Advertisement

नशेच्या व्यसनापायी बनला चोर; बजाजनगरातील डॉक्टरांच्या घरफोडीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश!

नागपूर : नशेचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरीच्या मार्गावर गेलेल्या तरुणाने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने डॉक्टरांचे घर फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रनगर परिसरात झालेल्या या घरफोडीचा गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणी १९ वर्षीय करण मेश्राम याला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांकडून तब्बल ४२ लाख ७९ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्रनगर येथील ४० वर्षीय डॉक्टर अतुल केशवराव कापसे हे कुटुंबासह भुवनेश्वर येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. हीच संधी साधत आरोपींनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज चोरून आरोपी पसार झाले. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुरुवातीला सुमारे ७ लाख १६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. या तपासातून लष्करीबाग, पाचपावली येथील करण मेश्राम याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, तर त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले.

नशेच्या व्यसनापायी बनला चोर; बजाजनगरातील डॉक्टरांच्या घरफोडीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश!

Advertisement

तपासात करणला नशेचे व्यसन असल्याचे आणि त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. व्यसनासाठी पैशांची गरज भागवण्याच्या उद्देशाने त्याने अल्पवयीन साथीदारासह घरफोडी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून २९६ ग्रॅम सोन्याचे आणि ६२४ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या करण मेश्रामला पुढील कारवाईसाठी बजाजनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपींनी यापूर्वी आणखी काही घरफोडीच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.