Published On : Sat, Jul 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अ‍ॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाला शासनाचे बळ, विस्तारासाठी सर्वतोपरी प्रयत्न; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Advertisement

नागपूर : अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीचा प्रसार, शैक्षणिक विस्तार आणि अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून या क्षेत्राच्या विकासात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन अ‍ॅक्युपंक्चर – अॅक्यूकॉन २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अ‍ॅक्युपंक्चरचे डॉ. रूमी बेरामजी, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अ‍ॅक्युपंक्चरचे अध्यक्ष डॉ. रमण कपूर, डॉ. नारायण नवले, डॉ. प्रदीप गुहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुमारे २३-२४ वर्षांपूर्वी स्वतःला तीव्र पाठदुखीचा त्रास होत असताना अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीमुळे मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे या उपचार पद्धतीची परिणामकारकता त्यांनी स्वतः अनुभवली आहे. “प्रत्यक्ष अनुभवातूनच विश्वास निर्माण होतो,” असे सांगत त्यांनी अ‍ॅक्युपंक्चर ही प्रभावी आणि सर्वसमावेशक उपचार पद्धती असल्याचे नमूद केले.

या क्षेत्रासमोरील अडचणी शासनाच्या निदर्शनास असून त्या दूर करण्यासाठी राज्य शासन पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

यावेळी डॉ. रूमी बेरामजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यामुळे अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीला प्रतिष्ठा आणि शैक्षणिक मान्यता मिळण्यास मोठी मदत झाल्याचे सांगितले. सध्या महाराष्ट्रात ४ हजार ५०० हून अधिक नोंदणीकृत अ‍ॅक्युपंक्चर तज्ज्ञ कार्यरत असून त्यापैकी सुमारे ६० टक्के महिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अ‍ॅक्युपंक्चरचे अध्यक्ष डॉ. रमण कपूर यांनीही राज्य शासनाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत अ‍ॅक्युपंक्चर क्षेत्राच्या विकासासाठी शासनाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.