Published On : Fri, Jun 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

अभिनेत्री करिश्मा कपूरवर दु:खाचा डोंगर; संजय कपूरचं हार्ट अटॅकने निधन

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या आयुष्यात एक अत्यंत दु:खद प्रसंग घडला आहे. तिचे माजी पती संजय कपूर (Sunjay Kapur) यांचं 53 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले आहे. ते यूकेमध्ये पोलो खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले आणि काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. संजय कपूर यांच्या या अकस्मात मृत्यूमुळे कपूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मृत्यूपूर्वी ट्विट केलं होतं अहमदाबाद विमान अपघातावर

Gold Rate
03 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,900 /-
Gold 22 KT ₹ 1,19,900 /-
Silver/Kg ₹ 1,82,800/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संजय कपूर यांचं निधन त्यांच्यापासून एक शोकदायक ट्विटही जोडलेलं आहे. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातावर त्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला होता. त्यांच्या या ट्विटमध्ये केलेली भावना आता त्यांचे अंतिम शब्द ठरली आहे, जी अनेकांना हृदय पिळवटून टाकणारी वाटते. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे विवाह २००३ मध्ये झाले होते. मात्र, त्यांचं वैवाहिक जीवन १३ वर्षांनंतर २०१६ मध्ये संपलं आणि दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले. विभक्तीनंतर, संजय कपूर यांनी २०१७ मध्ये प्रिया सचदेवशी विवाह केला, आणि त्यांना एक मुलगा अजारियस झाला. दुसरीकडे, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना दोन मुलं समायरा आणि कियान आहेत.

कॉर्पोरेट क्षेत्रातही धक्का-

संजय कपूर हे ‘सोना कॉमस्टार’ कंपनीचे चेअरमन होते, आणि त्यांच्या निधनाने कॉर्पोरेट क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. संजय कपूर यांच्या अचानक मृत्यूने करिश्मा कपूरसह त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का दिला आहे. ज्या व्यक्तीने अपघातग्रस्त कुटुंबांसाठी प्रार्थना केली होती, त्याच व्यक्तीने स्वतः अचानक या जगाचा निरोप घेतला, ही बाब त्यांच्या जवळच्या लोकांसाठी एक वज्राघात ठरली आहे.

Advertisement
Advertisement