Published On : Wed, Dec 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री फडणवीस यांचा बनावट व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; १२ जणांवर गुन्हा दाखल

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र सायबर विभागाने मोठी कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या १२ विविध सोशल मीडियावरील खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

फडणवीस यांच्या भाषणातील नेमके संवाद बाजूला काढून त्याआधारे हा खोटा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बनावट व्हिडिओमुळे फडणीस यांच्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतो, समाजातील एका गटाच्या भावना दुखावू शकतात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची तक्रार भाजपने सायबर सेलकडे केली.

त्या आधारे गुन्हा नोंदवत, व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती आणि तो पसरवणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच द्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब, फेसबुक या समाजमाध्यमांना नोटीस बजावत, खातेधारकांची माहिती मागविण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा नोंदवत तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने सायबर विभागाने पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement