Published On : Mon, Feb 1st, 2021

जानेवारी महिन्यात ५७९२ उपद्रवींवर कारवाई

Advertisement

मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कामगिरी : ४४ लाखाहून अधिक दंड वसूल

नागपूर : नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे असे आवाहन नागपूर महानगरपालिका सतत करीत असते. तरीही काही व्यक्तींकडून सतत नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा व्यक्तींवर निर्बंध घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे नियमित कारवाई सुरू आहे. शहरात केलेल्या विविध कारवाई अंतर्गत उपद्रव शोध पथकाने जानेवारी महिन्यात एकूण ५७९२ उपद्रवींवर कारवाई करीत ४४ लाख ८४ हजार ०५० रूपयाचा दंड वसूल केला आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात दहाही झोन पथकाद्वारे ही करवाई करण्यात आली.

१ ते ३१ जानेवारी या कालावधित उपद्रव शोध पथकाद्वारे केलेल्या विविध करवाईत पुढिलप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.

हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परीसरात अस्वच्छता करणाऱ्या ६८ उपद्रवींकडून २७ हजार २०० रूपये, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ५३ उपद्रवींकडून ५ हजार ३०० रूपये, मोकळ्या जागेवर किंवा फुटपाथवर कचरा टाकणाऱ्या २१ दुकानदारांकडून ८ हजार ४०० रूपये, मोकळ्या जागेवर किंवा फुटपाथवर कचरा टाकणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेसकडून २ हजार रूपये, रस्ता फुटपाथ, मोकळ्या जागेत कचरा करणाऱी दवाखाने, इस्पितळे आणि पॅथालॅबकडून २ हजार रूपये, सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यासाठी मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटर्स सर्व्हिस प्रोव्‍हायडर अशा १२ उपद्रवींकडून २४ हजार रूपये, शहरात विना परवानगी जाहिरातीचे फलक, बॅनर लावण्यासाठी २ हजार रूपये, वैयक्तीक कामासाठी मंडप किंवा स्टेज टाकूण वाहतूकीचा रस्ता बंद करणाऱ्या/मास्क कारवाईत ४३२६ उपद्रवींकडून २६ लाख ३० हजार ९५० रूपये, सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ किंवा मोकळ्या जागेवर जनावरे बांधणाऱ्या ४ उपद्रवींकडून ४ हजार रूपये, सार्वजनिक ठिकाणी जनावरे/वाहने धुवून परिसर अस्वच्छ करणाऱ्या ३ उपद्रवींकडून ३ हजार रूपये, रस्ते, वैद्यकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकण्यासाठी ८५ हजार रूपये, वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्‍यवसायीकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यासाठी ३९ कारवाईत ३९ हजार रूपये, सार्वजनिक रस्त्यावर, फुटपाथवर विना परवानगी बांधकाम साहित्य साठविणाऱ्या ४७३ व्यक्तींवर ९ लाख ४६ हजार रूपये आणि २ बिल्डरकडून २० हजार रूपये, सार्वजनिक ठिकाणी इमारतीचा मलबा टकण्यासाठी केलेल्या २१ कारवाईत ७१ हजार ५०० रूपये, इतर उपद्रवांसाठी ४५८ व्यक्तींवरील कारवाईत ९१ हजार ६०० रूपये आणि २५१ संस्थांकडून २ लाख ५१ हजार रूपये, सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळण्यासाठी दोनशे रूपये, हरित लवाद यांनी दिलेल्या दिनांक ०३.०७.२०१७ च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्सवरील ४ कारवाईत ४० हजार रूपये आदी उपद्रवांसाठी दंडात्कक कारवाई करून ४४ लाख ८४ हजार ०५० रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मागिल एक महिन्यातील झोननिहाय कारवाई

उपद्रव शोध पथकाने दहाही झोनमध्ये एकूण ५७९२ कारवाई करण्यात आल्या. यामध्ये

झोन कारवाई दंड वसूल

लक्ष्मीनगर झोन क्रं. १ ६८७ ३,९९,५००

धरमपेठ झोन क्रं. २ ८६८ ७,३६,७००

हनुमान नगर क्रं. ३ ६७७ ४,३२,९००

धंतोली झोन क्रं. ४ ४३५ ५,१५,२००

नेहरूनगर झोन क्रं. ५ ४५२ ३,८०,९५०

गांधीबाग झोन क्रं. ६ ४८५ ४,२०,०००

सतरंजीपूरा झोन क्रं. ७ ३४५ ३,२८,९००

लकडगंज झोन क्रं. ८ ६३८ ४,०७,२००

आशीनगर झोन क्रं. ९ ५२८ ४,३८,१००

मंगळवारी झोन क्रं. १० ६८७ ४,२४,६००

एकुण – ५७९२ ४४,८४,०५०