Published On : Wed, Jan 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

उघड्यावर लघुशंका करणाऱ्या १५८ जणांना कारवाई

ऑक्टोबर ते ११ जानेवारी दरम्यान ७९००० रुपये दंड वसूल : उपद्रव शोध पथकाची मोहीम सुरूच
Advertisement

नागपूर: शहरातील सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ करून उपद्रव पसरविणा-यांविरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे कठोर पवित्रा घेण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका तसेच रस्त्यावर वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांनावर नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ११ ऑक्टोबर ते ११ जानेवारी या दरम्यान उघड्यावर लघुशंका करणाऱ्या १५८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर लघुशंका करणा-यांकडून उपद्रव शोध पथकाद्वारे प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. मागील चार महिन्यात १५८ जणांकडून ७९००० रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावर वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणा-यांविरोधातही मनपाने कठोर पाऊले उचलली असून आजवर १७ जणांवर कारवाई करीत प्रत्येकी १ हजार रुपये या प्रमाणे १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. दोन्ही कारवाईंमध्ये एकूण ९६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली असून ११ जानेवारी पर्यंत १४ हजार ४१३ प्रकरणाची नोंद करण्यात आली असून तब्बल ६९ लाख ५८ हजार ०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Gold Rate
29 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,14,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहराला राहणीमानाच्या दृष्टीने उत्तम शहर साकारण्यासाठी महानगरपालिका कार्यरत आहे. नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी मनपाद्वारे विशेष पाऊल उचलल्या जात आहेत. विविध उपाय योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न मनपाचा आहे. असे असताना शहरात अस्वच्छता पसरवून परिसर घाण करणाऱ्या नागरिकांवर उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख श्री. वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख श्री. संजय खंडारे, धरमपेठ झोनचे श्री. धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे श्री. पवन डोंगरे, धंतोली झोनचे श्री. नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे श्री. नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे श्री. सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे श्री. प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे श्री. सुधीर सुडके, आशीनगर झोनचे श्री. संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे श्री. नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवानांसोबत अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर धडक कारवाई करीत आहेत.

नेहरूनगर झोनमध्ये उघड्यावर लघुशंका करणारे सर्वाधिक

सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका करीत परिसर अस्वच्छता पसरविणाऱ्या सर्वाधिक प्रकरणाची नोंद ही नेहरूनगर झोनमध्ये करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या कारवाई नुसार आजवर नेहरूनगर झोनमध्ये ४४ पेक्षा अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २२००० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सर्वात कमी प्रकरणाची नोंद ही लक्ष्मीनगर झोन मध्ये करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये केवळ ४ प्रकरणाची नोंद असून, त्यांच्याकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापाठोपाठ सतरंजीपूरा झोनमध्ये २९ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर धरमपेठ झोनमध्ये ९ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हनुमाननगर झोनमध्ये ११ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच धंतोली झोनमध्ये ६ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गांधीबाग झोनमध्ये १८ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लकडगंज झोनमध्ये १६ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आशीनगर झोनमध्ये ११ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी झोनमध्ये १० प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement