Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Apr 3rd, 2021

  भंडारा शहरातील दोन जीमवर कारवाई

  विना मास्क कारवाई

  भंडारा:- सायंकाळी सात वाजेनंतर सुरू असल्याने शहरातील गणेशपूर व मोहाडी रोडवर असलेल्या दोन जीमवर उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड व तहसीलदार अक्षय पोयाम यांनी कारवाई केली. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे व मास्क न वापरल्यामुळे या जीमवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

  उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी भंडारा शहरातील अँटालिक जीम व न्यू यंग जीमला काल अचानक भेट दिली असता सायंकाळी उशिरा पर्यंत जीम सुरू असल्याचे निदर्शनास आले त्याच प्रमाणे अनेक लोक बिना मास्क आढळून आले.

  अँटालिक जीम व न्यू यंग या दोन जीमवर कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणे यासाठी अँटालिक जीमला 5900 तर न्यू यंग जीमला 5000 दंड करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी यांनी केली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145