Published On : Sat, Apr 3rd, 2021

जिल्हाधिकारी व एसपी यांच्या उपस्थितीत पवणीत पथसंचलन

Advertisement

•कोविड विषयी जनजागृती
•नियमांचे पालन करण्याचे आवाहन
•मास्क वापरणे अनिवार्य
•पवनी कोरोना हॉटस्पॉट

भंडारा:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पवनी तालुका हॉटस्पॉट ठरत असून मार्च महिन्यात पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या उपस्थितीत आज फूट मार्च काढण्यात आला. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा व सुरक्षित अंतर पालन करावे याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधु तसेच महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पवनी शहरातील पदमा वार्ड व सोमवारी वार्ड येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली.

Gold Rate
July 10 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,400 /-
Gold 22 KT ₹ 1,34,000 /-
Silver/Kg ₹ 2,25,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होतांना दिसत नाही. 3 मार्च रोजी पवनी तालुक्यात 88 कोरोना पॉझिटिव्ह निघाले तर तालुक्यात 426 रुग्ण अक्टिव्ह आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी जिल्हाभरात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यादृष्टीने आज पवनी शहरात जिल्हाधिकारी व एसपी यांच्या उपस्थितीत पोलीस दलाने पथसंचलन करून नियमांचे पालन करा असा संदेश दिला.

Advertisement

कोरोनाचा प्रकोप वाढत असतांनाही काही नागरिक अजून मास्क न लावताच फिरत आहेत. या बाबतीत दंडात्मक कारवाई करूनही जबाबदारीचे वहन होतांना दिसत नाही. ही बाब नागरिकांमध्ये जाऊन सांगण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील दोन सर्वोच्च अधिकारी या पथसंचलनात सहभागी झाले. त्यांनी नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन केले.

कोरोना वाढीचा वेग पाहता नियमांचे काटेकोर पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असून आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा. साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा. साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason Explained | Nagpur Today

Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason...

₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds

₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds

खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident #accident

खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident...

नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional #CentralJail

नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...

पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV #newsupdate

पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges