Published On : Thu, Feb 25th, 2021

गुरुवारी १८ मंगल कार्यालयांवर कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २५) रोजी १८ मंगल कार्यालय, लॉन वर कारवाई करुन रु. २,०१,००० चा दंड वसूल केला. पथकानी १०६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.