Published On : Wed, Dec 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ऑनलाइन सट्टेबाजीवर कारवाई; २४ जणांवर गुन्हा, तब्बल ३६.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर -अजनी पोलीसांनी ऑनलाइन सट्टेबाजीच्या मोठ्या नेटवर्कवर धडक कारवाई करत २४ संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई १ डिसेंबर रात्री ८.३५ वाजल्यापासून २ डिसेंबर मध्यरात्री १२.४० पर्यंत सलग करण्यात आली. दोन ठिकाणी झालेल्या या छापेमारीत पोलिसांनी तब्बल ३६ लाख ९३ हजार ३८० रुपयांच्या मालमत्तेचा जप्ती केला आहे.

रूपनगरमध्ये पहिली कारवाई, एका आरोपीला रंगेहाथ पकडले-
गुप्त माहितीनुसार पोलिसांनी रूपनगर, आम्रपाली गार्डनच्या गल्लीत छापा टाकला. येथे श्रमजीवी नगरचा मनविश्वास देशभ्रतार (वय २१) मोबाइलवर ऑनलाइन सट्टा ‘लागवाडी’ करताना अटक करण्यात आला. चौकशीत त्याने सांगितले की, तो ही माहिती व्हॉट्सअॅपवर ‘सम्राट’ नावाच्या व्यक्तीला लाइन नंबर-१ वर पाठवतो.

मर्सेडीज आणि इनोव्हा कारसह महागडे उपकरणे जप्त-
पोलिसांनी या कारवाईदरम्यान:

२४ मोबाईल फोन
४ की-पॅड मोबाईल
१ लॅपटॉप
ऑडिओ मिक्सर मशीन
३२ QR कोड स्कॅनर
विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य
आणि मर्सेडीज बेंझ (MH-29-CF-0005) व इनोव्हा कार (MH-12-CR-8844) यांचा ताबा घेतला. जप्त मालमत्तेची किंमत अंदाजे ३६.९३ लाख रुपये आहे.
अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध धारा १२(१), ४, ५ नुसार गुन्हा नोंदवला असून ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे वरिष्ठ थानेदार नितीनचंद्र राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

Advertisement

दुसरी कारवाई: निशानदेहीवर प्रोजान अपार्टमेंटमध्ये २३ आरोपींना अटक-
पहिल्या आरोपीच्या निशानदेहीवर न्यू मनीष नगर येथील ‘प्रोजान अपार्टमेंट’च्या फ्लॅट क्र. ५०५ मध्ये छापा टाकून २३ संशयितांना अटक केली. हे सगळे आरोपी मोबाइलवरून सट्टा-पट्टीसाठी पैसे खायवाडी आणि लागवाडी करत होते.

अटक केलेल्या प्रमुख आरोपींची यादी-
अंकुश शिरगुरवार (२४), श्रीकृष्ण बोरकर (२५), ओम सविता (१९), कुश राय (२५), ओम आंबेकर (२०), अभिषेक येडलावार (२२), हर्ष शर्मा (२२), कृष्णा सविता (२०), अभिराज कुभरे (१९), पवन मडावी (२८), अंकित अनाके (२४), रामकिसन आत्राम (२८), राकेश अक्केवार (२९), उमेश चिचघरे (२५), कार्तिक मडावी (२९), संकेत जाधव (२२), अकालसिंह जूनी (१९), अमोल धुर्वे (२२), शिवम मडावी (२६), अविनाश वझलवार (२८), श्रीनिवास परशावार (४९), धीरज सुरावार (३२), आकाश किशोर बोरेले (३२).

दरम्यान अजनी पोलिसांनी अखंड आणि व्यवस्थित पद्धतीने घेतलेल्या या कारवाईतून ऑनलाइन सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून तब्बल २४ संशयितांना अटक केली आहे. पोलिस आता या सट्टेबाजी रॅकेटमागील मास्टरमाइंडचा शोध घेत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.