Published On : Tue, Jun 29th, 2021

मंगळवारी ७ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २९ जून) रोजी ७ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ४०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ७१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.