Published On : Wed, May 12th, 2021

बुधवारी ३४ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १२ मे) रोजी ३४ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,६८,००० चा दंड वसूल केला. म्हाळगीनगर चौक येथील सागर आयस्क्रीम पार्लर ला हनुमाननगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले.

त्याचप्रमाणे आसीनगर झोन अंतर्गत एनआयटी स्वेअर वैशालीनगर येथील श्री कलेक्शन ला आसीनगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. पथकाने ६२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.